आर्थिक फसवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

0
88

वाकड, दि. 8 ऑगस्ट (पीसीबी) -फार्मची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीचा प्रकार 1 एप्रिल 2022 ते 2 सप्टेंबर 2023 या कालावधीत रहाटणी येथे घडला.पोपट मुरलीधर नाटकर (वय 50, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), गोरखनाथ रामनाथ शिंदाडे (वय 35, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संदीप कृष्णा आलम (वय 53, रा. सेनापती बापट रोड, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोपट नाटकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून फिर्यादी यांच्या व्हिजन डेव्हलपर्स आणि बिल्डर्स फर्मचा विश्वासघात करून 82 लाख 25 हजार 370 रुपये रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून फिर्यादी यांच्या फर्मची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.