पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – संत तुकाराम नगर येथील आण्णा भाऊ साठे PCMC प्राथमिक शाळा येथील सुमारे 90 विद्यार्थी वर्ग व शिक्षकांचे योगा सत्र घेतले गेले.
गितामाता आर्ट्स कॉमर्स सायन्स महाविद्यालय, चिंचवड येथे सुमारे 130 विद्यार्थी वर्ग व शिक्षकांचे योगा सत्र घेतले गेले.
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची प्राथमिक शाळा क्र 51, पिंपळे सौदागर येथे ही सुमारे 120 विद्यार्थी वर्ग व शिक्षकांचे योगा सत्र घेतले गेले.
ह्या वर्षी ही 250 पेक्षा ही जास्त जणा पर्यन्त योगा आणि योग जीवनशैली ह्या बाबत चे शिबिर सत्रांचे आयोजन आणि प्रात्यक्षिके सचिन नाईक, उर्मिला सोनार, राजेश्वरी गवलिकर, शंकर सोनार, प्रमिला कोळी, रमेश कोळी, योगिता धालपे, रवी सकाते ह्यांनी केले.
ह्या सर्व शाळा आणि महाविद्यालय मधील सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक वर्ग मुख्याध्यापक सर्वांना खूप अप्रतिम असे अनुभव आले.
“योगा ने आपल्या मध्ये योग्यता येते.” हे परम पूज्य श्री श्री रविशंकर जी ह्यांच्या गुरुवचानाने योग दिवसाची सांगता झाली.
तसेच ३ जुलै संत तुकाराम नगर ला होणाऱ्या आयुर्वेदिक नाडी परीक्षा साठी ही सर्वांना आमंत्रित केले गेले.