आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे भंंडारा डोंगरावर मोठे वृक्षारोपन

0
500

देहू, दि. २२ (पीसीबी) – दि आर्ट ऑफ लिव्हिंग पिंपरी-चिंचवड परिवार व वन- विभाग तर्फे श्री क्षेत्र देहू भंडारा डोंगर, देहू येथे सालाबाद प्रमाणे या वर्षी २००० देशी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. पहिला टप्पा १७ जुलै रविवारी ५०० देशी वृक्ष लावून पार पडला. पुढील ५ वर्ष संगोपनाच्या जबाबदारीसह हे काम आहे.

आपण फोटो मध्ये पाहू शकतो, आर्ट ऑफ लिव्हिंग चे हे २०० हून अधिक उत्साही स्वयंसेवक ज्या पद्धतीने वृक्ष लागवडी नतर वृक्षांना जाळी लावणे दर रविवारी जाऊन खत, पाणी संवर्धन साठी आवश्यक असणारे सर्व सेवा कार्य करत असतात.

तसेच ह्या शनिवार व रविवारी २३ व २४ जुलै ला ही असेच ५०० वृक्ष रोपणाचा दुसरा टप्पा होणार आहे तरी सर्व निसर्गप्रेमी ना सेवे करिता आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार तर्फे आमंत्रित केले जात आहे.

असे मागच्या दोन वर्षां मध्ये ८५० वृक्षांची लागवड व जोपासना खूप चांग्याप्रकारे आर्ट ऑफ लिव्हिंग चे स्वयंसेवक करत आहेत, श्री क्षेत्र भंडारा डोंगर च्या पायथ्याशी इंदुरी- जांबवडे येथे जे देशी वृक्षांचे नंदनवन उभारले जात आहे तिथे येऊन आपण स्वतः त्या आंतरिक समाधान, आनंदाचा अनुभव नक्कीच घेऊ शकता.