हिंजवडी, दि. २३ (पीसीबी) – आरडाओरडा करते म्हणून आईने तिच्या अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण केली. यात मुलीच्या हातावर, पायावर, छातीवर गंभीर दुखापत झाली. ही घटना 12 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पारखेवस्ती, वाकड येथे घडली.
याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिच्या 17 वर्षीय मुलीला मोठमोठ्याने आरडाओरडा करते, या कारणावरून लाटण्याने मारहाण केली. यात मुलीच्या दोन्ही हातावर, दोन्ही पायावर, गुडघ्यावर, घोट्यावर, छातीत बरगडीवर डोक्याला मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.











































