आरक्षणाची धग- २१ मराठी विद्यार्थ्यांनी ओबीसी नेते मनोहर धांडेंची शाळा सोडली

0
2


दि.१३(पीसीबी)-मराठा आरक्षणासंदर्भात शासनानकडून काढण्यात आलेल्या जीआरला ओबीसी समाजातून विरोध केला जात आहे. आतापर्यंत दोन जणांनी या जीआरविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यातील एक याचिका नांदेडमधून अखिल भारतीय वीरशैव युवक महासंघाचे अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे यांनी दाखल केली आहे. मराठ आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याने मराठा समाजात संतापाची लाट पसरली असून याचीच धग आता शिक्षण संस्थेवर पाहायला मिळत आहे. ज्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्या मनोहर धोंडे यांच्याच संस्थेत शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुलांना शाळेतून बाहेर काढण्यासाठी अर्ज केला. रिसनगाव येथील 21 जणांनी विद्यार्थ्यांच्या टीसीसाठी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरीकडे, ओबीसी समाजानेही आता मराठा संस्थाचालकांच्या शाळांमधून मुले बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे उपोषण केले होते. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत धडकले होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सरकारने हैदराबाद गॅजेटसह अनेक मागण्या मान्य केल्या. हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर राज्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. सरकारने जारी केलेल्या जीआरविरोधात अनेक जिल्ह्यात मोर्चे काढले जात आहेत. याच दरम्यान जीआरविरोधात दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नांदेडहून प्रा मनोहर धोंडे यांचा समावेश आहे.

धोंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर रिसनगावं येथील मराठा समाज आक्रमक झाला आहे. याचिकाकर्ता प्रा मनोहर धोंडे यांची लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे स्व मीनलताई ठाकरे निवासी आश्रम शाळा आहे. या शाळेत मराठा समाजासह सर्वच समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. धोंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याने मराठा समाजातील 21 जणांनी मुलांच्या टीसीसाठी सामूहिक अर्ज केला आहे. या प्रकारानंतर गावात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झाला आहे.