आरएसएस प्रमुख मोहन भागवत राष्ट्रऋषी समान – मौलवी इलियास

0
321

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे ‘राष्ट्रपिता’ आणि ‘राष्ट्रऋषी’ समान आहेत, असं विधान इमाम ऑर्गनायझेनशचे प्रमुख डॉ. उमर अहमद इलियासी यांनी म्हटलं आहे. सकाळी दिल्लीत या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यानंतर भागवतांच कौतुक करताना इमाम यांनी हे विधान केलं आहे.

मौलवी इलियासी म्हणाले, “माझ्या निमंत्रणावर मोहन भागवत यांची भेट झाली. भागवत हे राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषी आहेत. त्यांच्या भेटीमुळं एक चांगला संदेश जाईल. आमचे देवाची पूजा करण्याची मार्ग भिन्न असतील पण मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे. देशाचा पहिल्यादा विचार व्हावा यावर आमचा विश्वास आहे”

भागवत आणि इलियासी यांची दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत असलेल्या इमाम हाऊस इथं भेट झाली. या दोघांच्या भेटीला उमर इलियासी आणि शोएब इलियासी यांनी सामाजिक समरसता असलेली भेट म्हटलं आहे.