आयुक्त शेखर सिंह यांनी सपत्नीक बजावला मताचा अधिकार

0
44

*पिंपरी, दि. 20 (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री.शेखर सिंह यांनी पत्नी श्रीम. ईशा सिंह यांच्यासोबत आपला मताचा अधिकार बजावला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात मासुळकर कॉलनीतील एस. एस. अजमेरा शाळेत रांगेत उभे राहून त्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे.

यावेळी सर्व मतदारांनी देखील आपला मताचा हक्क बजावावा, असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले आहे.