महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची बदली नाशिक कुंभमेळा आयुक्त पदावर झाली आहे. तूर्तास त्यांचा पदभार मेट्रोचे मुख्य अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्याकडे तत्काळ सुपूर्द करण्याचे आदेशआज सायंकाळी शासनाने काढले आहेत.
सातारा जिल्हाधिकारी पदावरून थेट महापालिका आयुक्त म्हणून १४ ऑगस्ट २०२२ रोजी शेखर सिंह यांची नियुक्ती कऱण्यात आली होती. तत्कालिन मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांची त्यासाठी शिफारस होती. सिंग यांच्या प्रशासकीय राजवटीतच अनेक प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले. तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.