आयुक्त फक्त आणि फक्त दादांचेच ऐकतात- माधव पाटील

0
2

दि.३०(पीसीबी)-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पुन्हा एकदा सोमवारी सकाळी ७ वाजता महानगरपालिकेत जाऊन आयुक्तांबरोबर बैठक घेतली. विविध कामांविषयी चर्चा केली.यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी अजित दादांना पिंपरी चिंचवड शहरात कायमचे राहण्याचे आवाहन केले आहे.

समाज माध्यमातील पोस्टद्वारे माधव पाटील म्हणतात की, दादांच्या कामाचा झपाटा पाहून मी दादांचा चाहता होतो आणि कायम असेल. पण प्रत्येक पिंपरीच्या चिंचवड कर म्हणतोय की

१) खुद्द अजितदादा आल्याशिवाय आयुक्त सुद्धा काम करत नाहीत
२) महायुतीच्या आजी- माजी आणि भावी नगरसेवकांचे आयुक्त ऐकत नाही, त्यामुळे गेल्या आठ वर्षात पिंपरी चिंचवड चा काहीही विकास झालेला नाहीये.
३) महायुतीच्या अर्धा डझन लोकप्रतिनिधींचे सुद्धा आयुक्त ऐकत नाहीत.
४) आयुक्त फक्त आणि फक्त अजित दादांचे ऐकतात.
५) त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने 128 जागांवरती फक्त आणि फक्त अजित दादांना उभे करावे कारण जनता दादांच्या कामाने खूप प्रभावित आहे आणि दादांशिवाय कोणतीही कामे होत नाहीत हे जनतेला कळून चुकले आहे.
मला विश्वास आहे दादांनी पिंपरी चिंचवडमध्ये कायमचा मुक्काम केला तर पुढच्या एका वर्षातच पिंपरी चिंचवडचा सिंगापूर, शांघाय किंवा स्वित्झर्लंड होईल.
हो आम्हाला पिंपरी चिंचवडचा शांघाय, सिंगापूर आणि स्विझरलँड झालेला पाहायचा आहे, दादा तुमचा कायमचा पत्ता पिंपरी चिंचवड करून घ्या ही विनंती.
यावर आता महायुती काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.