आयशर टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

0
69

महाळुंगे, दि. 11 (पीसीबी) : आयशर टेम्पो ने एखाद दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकी वरील महिलेचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास भांबोली फाटा ते आंबेठाण रस्त्यावर भांबोली येथे घडली.

अलका बंडू दिवसे (वय 55, रा. किनई, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. बंडू सखाराम दिवसे हे जखमी झाले आहेत. रायसाहब राममूर्ती यादव (वय 30, रा. उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी शंकर रंगनाथ दिवसे (वय 47, रा. कान्हेवाडी तर्फे चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर यांचे चुलते बंडू दिवसे आणि त्यांच्या पत्नी अलका दिवसे दुचाकीवरून भांबोली फाटा ते आंबेठाण गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. स्वरा लेडीज शॉपी या दुकानासमोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला आयशर टेम्पोने धडक दिली. या अपघातात अलका यांच्या मानेवरून टेम्पोचे चाक गेले. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन त्या मयत झाल्या. तर बंडू दिवसे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.