आयफोन निम्म्या किमतीला विकण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक

0
291

हिंजवडी, दि. ६ (पीसीबी) – वधुवर सूचक मंडळाच्या व्हाट्स अप ग्रुप मधून ओळख झालेल्या एकाने अॅपल कंपनीचा मोबाईल निम्म्या किमतीला देण्याच्या बहाण्याने महिलेची 55 हजारांची फसवणूक केली. ही घटना 24 ते 30 एप्रिल या कालावधीत हिंजवडी परिसरात घडली.

वेदांतसिंग नवीनसिंग (मोबाईल क्रमांक 9049240750, 9845064509, 7406601234) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने सोमवारी (दि. 4) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी वधुवर सूचक मंडळाच्या व्हाट्सअप ग्रुपवर बायोडाटा शेअर केला होता. तिथून त्यांची आरोपीसोबत ओळख झली. आरोपीने तो अॅपल कंपनीत सेल्समन म्हणून कामाला आहे, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. अॅपल कंपनीचा आयफोन १४ हा मोबाईल फोन 50 टक्के डिस्काउंट मध्ये देतो असे सांगून आरोपीने फिर्यादीकडून 55 हजार रुपये ऑनलाईन माध्यमातून घेतले. पैसे घेऊन फोन न देता फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.