चिंचवड, दि.02 (पीसीबी)
आयपीओ आणि ट्रेडिंग करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ७६ लाख ११ हजार ७०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १० नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडली.
याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राधाकृष्णन नायर, ऐश्वर्य शास्त्री जिओजित आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना व्हाट्स अप वर मेसेज कृंत यांना एका ग्रुप मध्ये जॉईन होण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना ब्लॉक ट्रेडिंग आणि आयपीओ खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना एक लिंक पाठवून त्यावरील वेगवेगळे ट्रेडिंगचे व्हिडीओ पाहण्यास सांगितले. गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून व्यक्तीकडून ७६ लाख ११ हजार ७०० रुपये घेत व्यक्तीची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करीत आहेत.