आयपीएस अधिकारी कृष्णा प्रकाश यांनी केला गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी असा पोहण्याचा विक्रम

0
381

मुंबई, दि. २७ (पीसीबी) : आयपीएस अधिकारी कृष्णा प्रकाश यांनी गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी असा पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय. त्यांनी ५ तास २५ मिनिटांत १६.२० किलोमीटरचे समुद्री अंतर पोहून पूर्ण केलं. भारतीय जलतरणपटूंना प्रेरणा मिळावी, यासाठी कृष्णा प्रकाश यांनी ही मोहीम हाती घेतल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे, याआधी बऱ्याच लोकांनी एलिफंटा लेणी ते गेट वे ऑफ इंडिया असे समुद्री अंतर पोहून पूर्ण केलंय. परंतु, कृष्णा प्रकाश यांनी समुद्र लाटांविरोधात म्हणजेच गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा असे अंतर पोहून पार करत नव्या विक्रमाला गवसणी घातलीय.

आयपीएस अधिकारी कृष्णा प्रकाश यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. “मी आज गेटवे इंडिया ते एलिफंटा लेणीपर्यंत पोहण्याचा काम पूर्ण करणारा जगातील पहिली व्यक्ती ठरलो. अनेकांनी एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेनं पोहण्याचा विक्रम केला आहे. परंतु, मी त्याविरुद्ध म्हणजेच गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा या दिशेनं पोहण्याचे ठरवलं. मी ५ तास आणि २६ मिनिटांत १६.२० किलोमीटर पोहून पूर्ण केलं. यामुळे भारतीय जलतरणपटूंना स्विमिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी प्रेरणा मिळेल”, असा विश्वास कृष्णा प्रकाश यांनी व्यक्त केला आहे.