– प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या उपक्रमाचे देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक
पुणे, दि. 04 (पीसीबी) : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळविले. राज्यात महायुती सरकारला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या अभियानाच्या माध्यमातून युवकांना घातलेली साद सार्थकी ठरली. हे अभियान तरुणाईला विशेष भावले. उद्याचा महाराष्ट्र खरोखरच विकसित महाराष्ट्र व्हावा या विचाराने भारावलेल्या बहुसंख्य तरुणाईने आपला मतरुपी आशीर्वाद महायुतीच्या पारड्यात टाकला. त्यामुळे हा विजय आणखीनच सुकर झाला. विकासाच्या वाटेवर अग्रेसर असणाऱ्या या सर्व तरुणाईचे आभार मानावे तेवढे थोडकेच आहेत, असे मत भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ” भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने तसेच विधानपरिषद आमदार व भाजयुमो प्रभारी विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या अभियानाच्या प्रचारार्थ संवाद दौऱ्याचे महिनाभर आयोजन करण्यात आले होते. विकसित महाराष्ट्रासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब आणि राज्यात देवेंद्र फडणवीस साहेब हे कसे अग्रेसर आहेत. याबाबत युवकांना आश्वस्त करण्यात आले. विविध योजनांच्या ‘ब्ल्यू प्रिंट’च युवकांसमोर सादरीकरण करण्यात आलं होत. भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी त्यासाठी महिनाभर राज्यातील तब्बल १९ जिल्हयात ६९०० किमीचा प्रवास केला.
प्रवासा दरम्यान बाईक रॅली आणि बैठकांद्वारे युवकांमध्ये जनजागृती करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत सुझावपत्र एकत्रित करीत मोठ्या संख्येने युवकांना या अभियानाशी प्रत्यक्षपणे जोडण्यात आले आहे. या दरम्यान सामाजिक व राजकीय स्तरावर कार्य करणाऱ्या अनेक युवक-युवतींशी संवाद साधण्यात आला. ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या अभियानाचा उद्देश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला.७६१७६१२०२४ या क्रमांकास मिस कॉल देऊन , क़्यु आर कोड, वेब साईट च्या माध्यमातून “विकसित महाराष्ट्र सदस्यता” अभियानात मोठ्या संख्येने युवक आणि युवतींना सामावून घेत त्यांचे विकसित महाराष्ट्र कसे असू शकते? याबाबत मते, संकल्पना आणि सूचना यात नोंदविण्यात आल्या, तसेच विकसित महाराष्ट्र Valenteer ची नोंदणी करण्यात आली. या पत्रकात प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ठ नेते गिरीश महाजन यांची युवा मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच भेट घेतली. उपक्रमाबाबत त्यांच्यासोबत आढाव बैठक संपन्न झाली. त्यांनी पुढील कार्यासाठी सज्ज होण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, निखिल चव्हाण, योगेश मैद, प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाठक तसेच युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यभरात भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकूण ६९६ मंडलांना भेटी दिल्या. त्याची सविस्तर विभाग आणि जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे…
पूर्व विदर्भ विभागात भेटी दिलेले जिल्हे आणि एकूण सक्रीय मंडल – ९५ …
वर्धा – १८, गडचिरोली – १६, गोंदिया – ११, चंद्रपूर शहर – ५, चंद्रपूर ग्रामीण – १६, भंडारा – ८, नागपूर शहर ६, नागपूर ग्रामीण -१५.
पश्चिम विदर्भ विभागात भेटी दिलेले जिल्हे आणि एकूण सक्रीय मंडल – ९६…
यवतमाळ – १२, अमरावती ग्रामीण – २१, अकोला ग्रामीण – १०, अमरावती शहर -७, बुलढाणा – १०, अकोला शहर -६, पुसद – ११, खामगाव -१०, वाशीम -९.
मराठवाडा विभागात भेटी दिलेले जिल्हे आणि एकूण सक्रीय मंडल – ११९…
लातुर ग्रामीण – १३, जालना – ९, बीड – १३, नांदेड उत्तर – ७, परभणी शहर – ७, हिंगोली – ७, लातूर शहर – ८, संभाजीनगर दक्षिण -५, धाराशिव – ९, नांदेड दक्षिण – ९, नांदेड शहर १०, संभाजीनगर शहर – ८, संभाजी नगर उत्तर – ५, परभणी ग्रामिण ९.
उत्तर महाराष्ट्र विभागात भेटी दिलेले जिल्हे आणि एकूण सक्रीय मंडल – १२६…
नाशिक उत्तर – १८, धुळे शहर – ९, नंदुरबार – ११, नगर नॉर्थ – ११, जळगाव पश्चिम – ११, जळगाव शहर – ९, मालेगाव ५ , नगर महानगर – ४, जळगाव पूर्व – ९, नाशिक शहर – १०, धुळे ग्रामीण – १०, नाशिक दक्षिण – ११, नगर साउथ-८.
पश्चिम महाराष्ट्र विभागात भेटी दिलेले जिल्हे आणि एकूण सक्रीय मंडल – १३७…
कोल्हापूर पश्चिम – ११, सोलापूर पश्चिम मध्य- ११, सांगली ग्रामीण १५, सोलापूर पूर्व – ८, पुणे उत्तर मावळ – १०, पुणे दक्षिण बारामती -१५, पिंपरी चिंचवड – ८, पुणे शहर – १३, सातारा – २०,सोलापूर शहर – ६, कोल्हापूर पूर्व – ७, सांगली शहर ७.
कोकण विभागात भेटी दिलेले जिल्हे आणि एकूण सक्रीय मंडल – १२३…
नवी मुंबई -१०, रायगड दक्षिण – १०, ठाणे ग्रामीण – ९, कल्याण – ८, सिंधुदुर्ग – ४, मीरा भायंदर – १०, पालघर – ११, रत्नागिरी उत्तर – ८, भिवंडी – ६, ठाणे शहर -१२, रायगड उत्तर ९, रत्नागिरी दक्षिण ८, उल्हासनगर ८, वसई विरार १०.
मुंबई वगळता ७३७ मंडळाशी थेट व्हाटसअॅपद्वारे कनेक्ट. त्याची विभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे…
विभाग व्हाटसअॅप समूह व्हाटसअॅप समूह सदस्य…
पश्चिम महाराष्ट्र १२५ १५,६७२
उत्तर महाराष्ट्र १२३ १५३२६
पूर्व विदर्भ ११० ९७८४ पश्चिम विदर्भ ९६ ११४४२
कोकण १२५ १३५७८
मराठवाडा १५० १०३४५
एकूण ७२७ ७५५४७
” विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी माझा महाराष्ट्राच्या युवाशक्तीवर प्रचंड विश्वास आहे. विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या तरुणांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने राज्यभर संवाद दौरा नुकताच संपन्न झाला. त्यास तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभला. तब्बल ४२६० बाईक रॅली आणि ४६११ बैठकांच्या माध्यमातून सतरा लाखांपेक्षा अधिक युवकांनी यात सहभाग घेतला. तसेच योजनेबाबत पावणेदहा लाखांच्या जवळपास सुजावपत्र प्राप्त झाली आहेत. ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या उपक्रमाला खरोखरच युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विकसित महाराष्ट्राचे महत्त्वाचे स्तंभ म्हणजेच युवांच्या कलागुणांना वाव देणे, महिलांना आत्मनिर्भर करणे, शेतकरी वर्गाला विकसित करणे या आणि अशा विविध घटकांना विकासाच्या महत्वपूर्ण वाटेवर अग्रेषित करणे हा ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ चा मुळ गाभा आहे. विकसित महाराष्ट्र हा उपक्रम नक्कीच भविष्यात आदर्शवादी ठरेल.”
– मा. अनुप मोरे, प्रदेशाध्यक्ष – भाजयुमो…