आयकर विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने पावणे पाच लाखांची फसवणूक

0
58

देहूरोड, दि. 19 (पीसीबी) : आयकर विभागात नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची चार लाख 78 हजार 700 रुपयांची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर 2022 ते मार्च 2024 या कालावधीत देहूरोड येथे घडली.

गौरव हरीश भाटिया (वय 34, रा. देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण एकनाथ पांचाळ (वय 22), एकनाथ पांचाळ (वय 50, दोघे रा. आदर्श नगर, काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव भाटिया हे डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांना आरोपींनी आयकर विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्या अनुषंगाने गौरव यांना आरोपींनी बनावट नियुक्तीपत्र देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी रोख व ऑनलाईन स्वरूपात चार लाख 78 हजार 700 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.