आयएमए तर्फे शनिवारी संदीप उबाळेंच्या दिवाळी स्वर पहाट कार्यक्रमाचे आयोजन

0
235

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशन ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी डॉक्टरांची संस्था आहे. ही संस्था फक्त डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचंच काम करत नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्याच्या माध्यमातून बरीच समाजोपयोगी कार्य करत करत असते. त्याच पद्धतीने आयएमए पीसीबी म्हणजे आयएमए पिंपरी चिंचवड भोसरी शाखेतर्फे असे उपक्रम राबवले जातात.उदाहरणार्थ ह्या वर्षी “आओ गांव चले” ह्या उपक्रमाअंतर्गत आयएमए पीसीबी ह्या वर्षात मावळातील गोडुंब्रे ह्या गावात मोफत आरोग्य शिबिर, विद्यार्थी प्रशिक्षण,वृक्षारोपण,गणपती मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण, निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम राबवत आहे.

ह्याचप्रमाणे डॉक्टर्स मंडळी आपले ताणतणाव कमी करण्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेत असतात.जे सर्वांसाठी विनामूल्य ठेवले जातात.तसंच ह्या वर्षी सुद्धा सालाबादप्रमाणे दिवाळीपहाट साजरी होणार आहे.

दिवस:- शनिवार दि.४ नोव्हेंबर
वेळ:-सकाळी ५.४५ ते ९
स्थळ:- गदिमा मुख्य नाट्यगृह प्राधिकरण आकुर्डी/निगडी.