आयएमए तर्फे गोडुंब्रे गावात श्रमदान-विद्यादान

0
351

गोडुंब्रे (मावळ), दि. २ (पीसीबी) – इंडीयन मेडीकल असोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी (IMAPCB ) शाखेच्या वतीने मावळातील गोडुंब्रे या गावी श्रमदान व विद्यादान उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. गावच्या सरपंच निशाताई गणेश सावंत, डॉ. दिलीप कामत व डॉ. प्रभाकर बुरुटे यांच्या हस्ते IMA व गोडुंबरे ग्रामपंचायत यांच्या वतीने नूतनीकरण केलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घघाटन करण्यात आले.

ग्रामप्रबोधिनी चे प्राचार्य व्यंकटेश भताने यांनी प्रास्ताविक केले. IMA चे अध्यक्ष डॉ सुशील मुथियान यांनी आओ गांव चले या अंतर्गत सुरू केलेल्या या उपक्रमाची माहिती दिली. उद्घघाटननानंतर मोफत सर्व रोग निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १७५ ग्रमस्थानी त्याचा लाभ घेतला. शिबिरासाठी वेगवेगळ्या विषयातील तीस तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली व औषध वाटप देखील करण्यात आले.

आयएमए चे सचिव डॉ. अनिरुद्ध टोनगांवकर, खजिनदार डॉ. विकास मंडलेचा यांनी संयोजन केले. डॉ. मिलिंद सोनवणे,डॉ मनीषा पाटील,डॉ. संजय देवधर, डॉ. संजीव दात्ये, डॉ. शुभांगी कोठारी, डॉ. बायना सुतार,डॉ. मयुर पुरंदरे , डॉ. संतोष माने ,डॉ. दीपक शिंदे, डॉ. हेमंत शिरसगर,डॉ. दीपाली टोनगांवकर, डॉ. सुवर्णा दिवाण, डॉ. मुगधा मार्कंडेय , डॉ. शाळिग्राम भंडारी, डॉ. रिहा मुथीयान, डॉ. प्रदीप नाईक ,डॉ. प्रताप फरांदे, डॉ. विजय सातव ,डॉ. सुहास माटे यांनी या उपक्रमासाठी विशेष योगदान दिले.

प्राथमिक आरोग्य केंद्र अडले चे आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी व पुणे जिल्हा नेत्र चिकित्सक डॉ. प्रकाश रोकडे यांचे मौलाचे सहकार्य लाभले.