आयएएस पंढरपूर वारी 2024 च्या जर्सीच्या अनावरण

0
227

पुणे ते पंढरपूर आठव्या सायकलवारीच्या निमित्ताने इंडो अथलेटिक सोसायटीतर्फे जर्सीचे अनावरण करण्यात आले,याप्रसंगी नगरसेवक अमितजी गावडे, ह भ प किसन महाराज चौधरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रकाश शेटबाळे, महावितरणच अधिकारी महेंद्र दिवाकर, इंडो अथलेटिक्स सोसायटीचे सदस्य गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ, त्याचप्रमाणे जॉय ईबाईक कंपनीचे सुनील चाको, तळेगाव येथील संजय साठे , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंतराव हरहरे, उद्योजक अण्णा बिरादार व इतर मान्यवर उपस्थित होते.

येत्या 15 जूनला पहाटे तीन वाजता निगडी येथून सायकल वारीचे प्रस्थान होणार आहे. जवळजवळ 1700 सदस्यांनी यावर्षी वारीमध्ये सहभाग घेतला आहे, पुणे ते पंढरपूर 250 किलोमीटर अंतर सर्व सदस्य एका दिवसात पार करणार आहेत, बारा वर्षापासून 80 वर्षापर्यंतचे सदस्य यामध्ये सहभागी झाले आहेत, भारतातील सर्व कोपऱ्यामधून सहभागी सदस्य येणार आहेत, या वारीमध्ये मागील वर्षी पेक्षा जास्त म्हणजेच 375 महिलांनी सहभाग घेतला आहे, पंढरपूर ला जाताना सोलापूर हायवेने भिगवन इंदापूर त्याचप्रमाणे वेणू गाव अशा विविध ठिकाणी सायकल पट्टूंचे स्वागत होते. असे संस्थेचे सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले

पंढरपूर वारीचे महत्त्व किसन महाराज चौधरी यांनी सांगितले तर इंडो ऍथलेटिक्स सोसायटीच्या विविध उपक्रमांचे कौतुक नगरसेवक अमित जी गावडे यांच्यातर्फे करण्यात आले. या सोसायटी तर्फे एक सक्षम पिढी देशामध्ये घडत आहे आणि आमचे असे चांगले उपक्रमांना नेहमी सहकार्य प्राप्त होईल महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन वानखेडे यांचे देखील नेहमी सहकार्य आत्तापर्यंत लाभले आहे आणि यापुढे देखील लाभत राहील असे प्रकाश शेडबाळे सर यांनी सांगितले.