आम आदमी पार्टी मावळची जागा लढणार – रविराज काळे युवक शहराध्यक्ष

0
359

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत असलेला अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष मावळ लोकसभेची जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविराज काळे यांनी युवक आघाडी आम आदमी पक्षाच्या येथे पुणे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मावळ या लोकसभेची जागा आपण लढवणार आहोत. सध्या ही जागा शिवसेना पक्षाकडे होती परंतु शिवसेना हा पक्ष सत्तेत असल्याने आम आदमी पक्ष ही जागा लढवणार आहे.महाराष्ट्रातील इतर जागांवर इंडिया आघाडीतील पक्षांचे उमेदवारांचे काम करणार आहोत असे रविराज काळे यांनी सांगितले. या जागेबाबत सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील पक्षाची ताकद इतर जागांच्या तुलनेत चांगली आहे.आपल्या कार्यकर्त्यांची ताकद पाहून आपण या जागेची निवड केली आहे. त्यासंदर्भात इंडिया आघाडीतील इतर पक्षाध्यक्ष यांच्याशी चर्चा करुन निर्णय होईल असे रविराज काळे यांनी सांगितले.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. असे कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले.