आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी चेतन गौतम बेंद्रे यांची नियुक्ती

0
272

पिंपरी,दि.३०(पीसीबी) – महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीच्या संघटन विस्तार कार्यक्रमाअंतर्गत पक्षाचे राज्य सह-प्रभारी गोपाल इटालिया व राज्य संघटन सचिव अजित फाटके यांनी जिल्हा निहाय नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी श्री. चेतन गौतम बेंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली. पक्ष स्थापनेपासून संघटनेत काम करत असताना बेंद्रे यांच्याकडे शहराच्या कार्याध्यक्षपदाचा कार्यभार होता. आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड मधील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढत असताना शहरांमध्ये पार्टीचे संघटन मजबूत करून येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये सर्वसामान्यांना राजकारणातील स्वच्छ पर्याय देणार असल्याचे चेतन बेंद्रे यांनी सांगितले.