आम्ही सारे सावरकर| चिंचवड मतदारसंघात वीर सावरकर गौरव यात्रेत हजारोंचा सहभाग

0
297

पिंपरी, दि.11(पीसीबी) : पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने महाराष्ट्राचे वीर सुपुत्र, थोर समाजसुधारक, तेजस्वी विचारवंत, स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ चिंचवड विधानसभा मतदारसंघात रविवारी (दि. ९) वीर सावरकर गौरव यात्रा ढोलताशे आणि टाळ मृदूंगाच्या गजरात काढण्यात आली. या गौरव यात्रेत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील हजारो सावरकर प्रेमी “आम्ही सारे सावरकर”च्या घोषणा देत उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.

सावकरांचे वशंज सात्यकी सावरकर, आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप व सावरकरांच्या वेशभूषेतील राजेंद्र परदेशी यांच्या हस्ते रहाटणी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर शिववंदना म्हणून वीर सावरकर गौरव यात्रेची सुरवात झाली.

या गौरव यात्रेत नादब्रह्म पारंपारिक ढोल ताशा पथक, सांगवीतील डोनेट सोसायटीचे महिला लेझीम पथक तसेच तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्था सांगवी यांनी सहभाग घेत आपल्या खेळांचे प्रदर्शन केले. त्याचबरोबर ज्ञानाई शिक्षण संस्थेच्या वारकरी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंग या वाद्यांच्या गजरात सहभाग घेतला.

स्वातंत्रवीर सावरकरांच्या गौरवार्थ बनविण्यात आलेला चित्ररथ हे या यात्रेचे विशेष आकर्षण होते. स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे सर्व नियोजन व आयोजन चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी केले. त्यांना सहाय्यक म्हणून जिल्हा सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी काम पाहिले.

अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या गौरव यात्रेत भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, विश्व हिंदू परीषदेचे पदाधिकारी धनंजय गावडे, नितीन वाटकर, सावरकर सामाजिक संस्थेचे श्रीनिवास कुलकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष संजय गायके, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती माजी अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी उपमहापौर झामाबाई बारणे, प्रदेश सदस्य संतोष कलाटे, चंद्रकांत नखाते, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चौंधे, महिला मोर्चा शहराध्यक्षा उज्वला गावडे, सांगवी-किवळे मंडलाध्यक्ष विनोद तापकीर, चिंचवडगाव-किवळे मंडलाध्यक्ष योगेश चिंचवडे, माजी नगरसेविका सुनिता तापकीर, उषा मुंढे, आरती चौंधे, सविता खुळे, शारदा सोनावणे, निर्मला कुटे, नीता पाडळे, अश्विनी चिंचवडे, वैशाली जवळकर, माजी नगरसेवक शशिकांत कदम, हर्षल ढोरे, संदिप कस्पटे, विनायक गायकवाड, सुरेश भोईर, बाबा त्रिभुवन, राजेंद्र गावडे, भाजपा नेते सचिन साठे, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, संदिप नखाते, गोपाळ माळेकर, संदिप गाडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे चिंचवड विधानसभेतील सर्व नगरसेवक, सर्व जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी तसेच मित्र पक्षातील शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम व प्रहार संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह चिंचवडमधील हजारो सावरकर प्रेमी नागरिक सहभागी झाले होते.