`आम्ही शिवसैनिकच…` असे एकच वाक्य केसरकर सारखे म्हणत होते, कारण…

0
293

मुंबई, दि. २५ (पीसीबी) : आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, असे भासवले जात आहे. राज्यात सध्या जे दाखवले जाते त्यापेक्षा परिस्थिती वेगळी आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्याची प्रतिक्रिया बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंडखोर नेत्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर केसरकर यांनी माध्यमांशी ऑनलाईन संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या या संवादात आम्ही बंडखोरांनी शिवसेना सोडलेली नाही, असाच दावा वारंवार केला. भाजपसोबत चला, हे आमचे म्हणणे पक्षप्रमुखांना सांगितले होते. पण त्यांनी ते ऐकले नाही. आममी मागणी त्यांनी मान्य करावी, हे वारंवार सांगितले.

शिंदे गटातील आमदारांना अपात्र करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव कायदेशीर नाही, असे केसरकर म्हणाले. शिवसेनेतच राहून स्वतंत्र गट स्थापन करण्याचा आम्हाला घटनात्मक अधिकार, असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेकडे 55 आमदार होते. आता आमच्या गटाकडे 50 आमदार आहेत. आमच्याकडे संख्याबळ आहे. ज्यांच्याकडे संख्याबळ आहे, अशा नेत्याला गटनेतेपदावरून हटवू शकत नसल्याचेही केसरकर यांनी सांगितले. शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्याचा निर्णय चुकीचा आहे, त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहे.