आम्ही मशिदी पाडू आणि मंदिरं वाचवू – प्रसाद लाड

0
39

मुंबई, दि. 1३ (पीसीबी)
एकही मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडलं जाणार नाही हा आमचा शब्द आहे. अनधिकृत मशि‍दींचा विषय आम्ही उचलला. मुंबईतल्या १२ मशिदी पाडण्यासाठी आम्ही नोटिसी दिल्या. उद्धव ठाकरेंना त्या मशीदवाल्यांची बाजू घ्यायची आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं. आम्ही मशिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित आहे, असे भाजप नेते आमदार प्रसाद लाड म्हणाले. दरम्यान, उध्दव ठाकरे यांच्या हिंंदुत्वावर नवनीत राणा यांच्या पाठोपाठ प्रसाद लाड यांनी तोफ डागल्याने हवा गरम आहे.

काय म्हणाले होते उध्दव ठाकरे –
मुंबईतल्या दादरमध्ये ८० वर्षांपासून असलेल्या आणि हमालांनी बांधलेल्या हनुमानाचं मंदिर आहे. या मंदिराला भाजपा सरकारने नोटीस पाठवली आहे. ती नोटीस माझ्याकडे आहे. तुम्ही रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केल्याचं सरकारचं म्हणणं आहे. हे मंदिर ८० वर्षांपूर्वीचं आहे, जे आता हे पाडायला निघाले आहेत. हे कुठलं हिंदुत्व आहे? आम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही हिंदुत्व सोडलं आहे का? मग तुम्ही हे काय सोडलं आहे? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचं मंदिर पाडलं जाण्याची नोटीस येते आहे. सिडकोतल्या मंदिरावर कुणाचा तरी डोळा आहे. हल्ली कुणाला सगळं मिळतं तुम्हाला माहित आहेच. बांगलादेशात मंदिर जाळलं जातं आहे. हिंदूंवर बांगलादेशात अत्याचार होत आहेत तरीही जे हिंदुत्व हिंदुत्व करतात त्या भाजपाची हिंदुत्वाची व्याख्या आणि आकारऊकार तरी काय? हे मला उत्तर मिळालं पाहिजे. निवडणुकीपुरतं फक्त हिंदुत्व भाजपाकडे उरलं आहे का? हिंदू म्हणजे फक्त मतं नाहीत. त्यांना भावना आहेत. आधी हिंदूंना घाबरवायचं आणि मग त्यांची मंदिरंही सेफ नाहीत असं जर असेल तर काय बोलायचं असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी म्हटलं आहे.

आता कुठे गेलं भाजपाचं हिंदुत्व? -उद्धव ठाकरे
आता कुठे गेलं आहे यांचं हिंदुत्व, बांगलादेशातली मंदिरं सेफ नाहीत आणि मुंबईतही नाहीत. एक है तो सेफ है म्हणत आहेत पण मंदिरंही सुरक्षित नाहीत. महाराष्ट्र बेकारीत क्रमांक एकवर आहे. त्यात हिंदू आहेत का? हे मला माहीत नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी विचारणार आहे की मुंबईतलं हनुमानाचं मंदिर हे ८० वर्षांपासून मुंबईत आहे. हमालांनी कष्टाने बांधलं आहे, तिथलं झाड वगैरे व्यवस्थित ठेवलं आहे. असं मंदिर बांधण्याचा फतवा रेल्वे खात्याकडून निघतो आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं हिंदुत्व काय करतंय? भाजपाचं हिंदुत्व काय करतं आहे? रामाचं मंदिर उभं करता आणि रामभक्त हनुमानाचं मंदिर कसं काय तोडता? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) विचारला आहे.