आम्ही तीन तास अभिनय करतो, तुम्ही ३६५ दिवस, प्रशांत दामलेंच्या टोलेबाजीने गाजले संमेलन

0
144

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) : ३६५ दिवस, चोवीस तास अभिनय करणारे राजकीय कलाकार व्यासपीठावर उपलब्ध आहेत. हे चोवीस तास अभिनय करतात आम्ही केवळ तीन तास अभिनय करत असतो. अचानक अध्यक्षपद मिळाल्याने मुख्यमंत्रीपद मिळाल्यासारखे वाटते, असे सांगत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी जोरदार फटकेबाजी केली.

नाट्य परिषद सेवाभावी संस्था आहे. त्यामुळे व्यवस्थित काम करणार आहे. संमेलन म्हणजे आमच्यासाठी दिवाळी आहे. परिषदेने तीन स्तरावर काम केले पाहिजे. निधीचा योग्य वापर करणे, पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आणि प्रेक्षकांची पिढी तयार केली पाहिजे. पुढच्या पिढीला नाटके पहायला लावली पाहिजेत. नाट्यगृहाची देखभाल ठेवली पाहिजे. नाट्यगृहावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविला पाहिजे. नाट्यगृहाची भाडे कमी केले पाहिजे. पिंपरी-चिंचवडमधील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भाडे जास्त केले आहे, विजेचे १४ हजार भाडे आहे, यात राजकीय लोकांनी लक्ष घालावे, असेही दामले म्हणाले.