आम्हाला महापालिका, लोकसभा, विधानसभांची चिंता नाही

0
265

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक अयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अध्यक्ष असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाने काढून घेतला आहे. हा आदेश निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केला. निवडणूक अयोगाच्या निर्णयानंतर जयंत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा याची आम्हाला चिंता नाही. असं म्हटलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?
आमच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का लागेल असं वाटत नाही. घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह कायम राहील. याबाबत माझ्या मनात शंका नाही. महाराष्ट्रापुरता हा विषय बघितलं, तर या चिन्हाला कोणताही धक्का लागत नाही असं दिसतं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा याची आम्हाला चिंता नाही.