आमदार शिवाजी कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन

0
68

दि.१८(पीसीबी)- राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 67 वर्षे होते. त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीराव कर्डिले यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने अहिल्यानगर येथील साईदीप साह्यद्री रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषीत केले.

कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंत आहे. त्यांचा मूळ व्यवसाय हा दूधाचा होता. मात्र, समजातील कार्यामुळे त्यांनी अल्पवधीतच राजकारणात आपली पकड मजबूत केली. नगर शहाराजवळ असणाऱ्या बुऱ्हानगर गावचे सरपंच ते आमदार, माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले. शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला.

2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता. 2014 च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती.