आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक 22 मध्ये “जन की बात”

0
4
  • चिंचवड विधानसभा मतदारसंघात उपक्रम
  • नागरिकांच्या समस्या व तक्रारींची तत्काळ होणार सोडवणूक

चिंचवड, दि. 15: चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांसाठी लोकप्रिय आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून “जन की बात संवाद | सेवा | समर्पण” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता काळेवाडीतील ज्योतिाबा मंगल कार्यालय या ठिकाणी होणार आहे. या वेळी आमदार शंकर जगताप स्वत: उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये शासकीय योजना, जनसामान्यांच्या तक्रारी, शासकीय दाखले, महापालिकेशी संबधित तक्रारी, वीज, पाणी, ड्रेनेजबाबतच्या नागरिकांच्या समस्या ते जाणून घेणार आहेत. नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महानगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा विभाग आणि इतर शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या संदर्भात आमदार शंकर जगताप म्हणाले की, “जन की बात” या कार्यक्रमाच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद, सेवा आणि समर्पण हा दिलेला मुलमंत्र प्रत्यक्षात अमलात आणण्याचा प्रयत्न होत आहे. शहरवासीयांच्या त्या त्या भागातील नागरिकांच्या तक्रारी व समस्या तातडीने सोडविल्या जाव्यात. त्यांच्या अडचणी दूर करून त्यांचा परिसर व संपूर्ण शहर स्वच्छ, सुंदर व विकसित कसे राहील, हा हेतू साध्य होत आहे. त्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी या “जन की बात” कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.