आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार.

0
433

अंत्यदर्शन दुपारी २ वाजता पिंपळे गुरव येथील निवासस्थानी

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावार सायंकाळी सात वाजता पिंपळे गुरव येथील स्मशानात अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहेत. दुपारी दोन वाजता त्यांचे पार्थिव पिंपळे गुरव येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रीमंडळाचे बहुतांश मंत्रीगण अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार असल्याचे समजले.
चिंचवड विधानसभेचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे कॅन्सरच्या आजाराने दीर्घ उपचाराअंती आज सकाळी दहा वाजता बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.