आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

0
133

पिंपरी, दि. ८ : भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी उदयकुमार राय नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.

भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला उदय कुमारने फोन करून महेश लांडगे यांची सुपारी मला मिळालेली आहे. अशी माहिती फोनद्वारे दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि अवघ्या काही तासांत उदयकुमार रायला ताब्यात घेतले आहे.

उदयकुमार राय हा छत्तीसगडचा असून गेल्या पाच वर्षांपासून तो भोसरी मध्ये राहत आहे. त्याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमकं धमकी देण्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत.