आमदार महेशदादा लांडगेंचा समर्थक अडचणीत

0
95

महापालिकेच्या प्रभाग रचनेत आमदार महेशदादा लांडगे यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक कुंदन गायकवाड हेसुध्दा अडचणीत सापडले आहेत.

२०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकित प्रभाग क्रमांक १ म्हणजे चिखली गावठाण – मोरेवस्ती मधून एससी प्रवर्गातून ते जिंकले होते. नवीन फेरबदलात या प्रभागातील ताम्हाणे वस्तीचा भाग कमी करण्यात आला. परिणामी लोकसंख्येच्या प्रमाणात एससी प्रवर्गाची टक्केवारी (१२.९७) पर्यंत खाली घसरली आणि एससी चे आरक्षण गेले. आता कुंदन गायकवाड यांना शेजारचा दुसरा सोयिचा प्रभाग नसल्याने त्यांचा पत्ता कट होणार आहे.
दरम्यान, याबाबत गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, आमचे नेते महेशदादा यांचा अद्याप काही आदेश आलेला नाही, ते काय सांगतिल त्यानुसार मी निर्णय घेणार. दुसरा पर्याय मिळाला तर लढणार.