आमदार बापूसाहेब पठारे यांना कार्यक्रमादरम्यान मारहाण

0
43

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना शनिवारी लोहगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार पठारे हे लोहगाव परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांसोबत त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर काही वेळातच जोरदार हाणामारीत झाले.

मारहाणीच्या घटनेत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला.

मारहाणीच्या घटनेत आमदार पठारे यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याने पोलिसांना तातडीने हस्तक्षेप करावा लागला. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

किरकोळ वादावादी झाली होती. कोणतीही मारहाण झालेली नाही. धक्काबुक्की झाली. आता प्रकरण शांत झाले आहे. असे पठारे यांनी सांगितले.