आमदार ठाकुर यांच्या सुटकेसाठी पुण्यात ‘महाआरती’ चे आयोजन

0
278

पिंपरी, पुणे (दि. २३ सप्टेंबर २०२२) तेलंगणाचे आमदार राजासिंह ठाकूर यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. आ. ठाकूर यांची अटकही ही राजकिय सुडबुद्धिने आणि पूर्व वैमनस्यातून करण्यात आली आहे.

आ. ठाकूर यांच्या प्रकृतीस आराम मिळावा व सुखरुप सुटका व्हावी यासाठी ‘सर्व हिंदु संघटनांच्या’ वतीने शनिवारी ( दि.२४) सायंकाळी ६ वाजता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीला बहुसंख्य हिंदू सकल समाज बांधवांनी उपस्थित राहून एकजुटीचे दर्शन घडवावे असे आवाहन कुणाल साठे यांनी केले आहे.
………………………………………….