आमदार चेतन तुपे महापालिकेला कुणबी म्हणून लढलेत, भूमिका संदिग्ध असल्याने कार्यकर्त्यांची नाराजी

0
242

हडपसर, दि. १ (पीसीबी) – हडपसरमधील भव्य मराठा मोर्चाला आमदारांनी दांडी मारली, ससाणेनगर साखळी उपोषणाला त्यांनी भेट दिली असताना मराठा कार्यकर्त्यांनी जाब विचारून तुम्ही उपोषणाला बसू नका, तुम्ही विधानभवनात जाऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा तेव्हा उपरती होऊन आमदारांनी मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे पत्र दिले, सध्या हे पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढवली होती, त्यातून ते नगरसेवक झाले 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा लढवली व हडपसरमधून आमदार म्हणून निवडून आले अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना राज्यातून मोठा प्रतिसाद या आंदोलनाला मिळत आहे.

हडपसर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य दिव्य मोर्चा हडपसरमध्ये काढण्यात आला. ओबीसी समाजाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनी मोर्चात सहभाग घेतला. मात्र, विद्यमान आमदार मराठा असूनही ते या आंदोलनाकडे फिरकले नाहीत. त्यानंतर ससाणेनगर येथे साखळी उपोषणास भेट दिली.