वाढदिवसाच्या दिवशी स्वतःच्या देणगीतून केले विविध विकास कामांचे उद्घाटन
चिंचवड, दि.२९ (पीसीबी) – आमदर उमाताई खापरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी दिलेल्या देणगीतून केलेल्या शाळेतील कामांचे उद्घाटन माजी मंत्री तथा विधानसभा विस्तारक योजना प्रदेश संयोजक श्री. कृपाशंकर सिंह जी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेत सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. आकुर्डी येथील बिना इंग्लिश मिडीयम शाळेत वर्ग व प्रयोग शाळेचे उद्घाटन केले. श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय चिंचवड येथे वेदर शेड चे उद्घाटन केले व शाळेला संगणक व स्क्रीन भेट देण्यात आले. त्याचप्रमाणे आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोर बस स्टॉप चे उद्घाटन करण्यात आले. याप्रमाणे सर्व समावेशक कार्यक्रमांचे उद्घाटन आ. उमा ताई खापरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले.
यावेळी सर्व शाळांचे प्राचार्य, चेअरमन, आ. उमा ताई खापरे, जिल्हाध्यक्ष श्री शंकरभाऊ जगताप, श्री अमर जी साबळे , श्री सदाशिव खाडे, श्री नामदेव ढाके, श्री अमित गोरखे, श्री अनुप मोरे, श्री राजू दुर्गे,श्री केशव घोळवे, श्री माऊली थोरात, श्री संजय मंगोडेकर, रीदा ताई राशिद, संजीवनी ताई पांडे, आशा ताई काळे, राजश्री जायभाय, गीता महेंद्रु, अश्विनी ताई जिचकार, शोभा ताई भराडे, नयना ताई मनतकर, दिपाली ताई धनोकार, तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.