आमदार अश्विनी यांनी केली शंकर जगताप यांच्या उमेदवारीची शिफारस

0
75

चिंचवड, दि. 18 (पीसीबी) : “चिंचवडमधून शंकर जगताप यांनाच उमेदवारी द्या..” अशी मागणी आमदार अश्विनी जगताप यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या जगताप कुटुंबातील गृहकलह मिटला असून शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांनी शंकर जगताप यांच्यासमवेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची काल पुण्यात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या रेणुसे या देखील उपस्थित होत्या. “माझ्या ऐवजी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवड मधून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी ⁠⁠आमदार अश्विनी जगताप यांनी केली.

शंकर जगताप हे अश्विनी जगताप यांचे दीर आहेत. दोघांमध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी वरुन अंतर्गत वाद सुरु असल्याचे बोलले जात होते. अखेर आमदार अश्विनी जगताप यांनी माघार घेत दीर शंकर जगताप यांचा विधानसभा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या घडामोडींमुळे जगताप कुटुंबातील वाद मिटला आहे.