आमदार अश्विनी जगताप यांचा अवमान करणाऱ्या कृतघ्न पदाधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

0
209

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील अनेकांना अपेक्षेपेक्षा अधिक दिले. निःस्वार्थीपणे कित्येकांना रंकाचा राव केला. त्या परिसाने त्यांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे सोनेच केले. मात्र, या सर्वाचे काहींना विस्मरण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप यांचा अवमान करणाऱ्या कृतघ्न पदाधिकाऱ्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी भाजपचे माजी शहरउपाध्यक्ष राम वाकडकर यांनी केली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वाकडकर यांनी म्हटले आहे की, पत्रकार परिषदेत आमदार अश्विनी जगताप यांना बसण्यासाठीची खूर्ची एका बाजूला ठेवण्यात आली होती. पक्षाचे सरचिटणीस नामदेव ढाके यांनी हेतुपुरस्सर जाणून-बुजून हा प्रकार केल्यानेच आमदार जगताप यांनी नामदेव ढाके यांचा भर पत्रकार परिषदेत पाणउतारा करून अचूक टायमिंग साधला.

मी अश्विनी लक्ष्मण जगताप आहे. माझ्या नादी लागू नका, पाठीमागून वार करु नका अशी (BJP) डरकाळी त्या वाघिणीने फोडली आहे. त्यामुळे पक्षात फूट पाडण्याचा व अंतर्गत कलह माजवून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्या ढाके यांचा भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी राजीनामा घ्यावा.

आमदार अश्विनी जगताप यांनी घेतलेल्या या पावित्र्याचे आम्ही लक्ष्मण जगताप समर्थक (BJP) समर्थन करतो. त्यांनी जे केले ते योग्यच होते. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप व आमदार अश्विनी जगताप यांच्यासोबत मी, शत्रुघ्न काटे व आमच्या सारखे हजारो कार्यकर्ते येथून मागेही होते आणि येथून पुढेही अत्यंत प्रामाणिक निष्ठेने त्यांच्यासोबत राहतील.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मिशन 45 घर चलो अभियानाच्या निमित्ताने आज शहरात आहेत. त्यांच्याकडे आम्ही सर्व कार्यकर्ते ढाके यांच्यावर कारवाई करण्याची आग्रही मागणी करणार आहोत तसे लेखी निवेदनही देणार (BJP) आहोत, असे वाकडकर यांनी सांगितले.