आमदार अमित गोरखे यांनी विधान भवन प्रवेश करतेवेळी पिंपरी-चिंचवड शहरात नदी विकास प्रकल्पाला(RFD) दर्शविला विरोध …

0
37

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यादरम्यान विधानभवनामध्ये प्रवेश करत्या वेळी पिंपरी-चिंचवडच्या पवना, मुळा, इंद्रायणी ला_

Cancer treatment करा !…
Beauty treatment नको !!…
पिंपरी-चिंचवडच्या पवना, मुळा, इंद्रायणी साठी…
RFD च्या नावाखाली ! वृक्षतोड थांबलीच पाहिजे !…

या आशयाचे पोस्टर घेऊन प्रवेश केला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र येत, पिंपरी चिंचवड शहरातील 500 हून अधिक सामाजिक संस्था या एकत्र येऊन संपूर्ण शहरभर मानवी साखळी द्वारे आंदोलन सुरू असून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) नदी विकास प्रकल्पाला(RFD) विरोध आमचा विरोध आहे,
. “वृक्षतोड थांबलीच पाहिजे!”, “आधी नद्या स्वच्छ करा!” आणि “नद्या वाचवू, निसर्ग टिकवू!” अशा यावेळी घोषणा देत त्यांनी नदीसंवर्धनाचा संदेश दिला.  
यावेळी बोलताना नद्यांचे नैसर्गिक स्वरूप अबाधित ठेवण्याची मागणी केली. पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांचे संवर्धन ३० लाखांहून अधिक नागरिकांसाठी महत्त्वाचे अधोरेखित केले. बांधकाम आणि कृत्रिम सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड, प्राण्या-पक्ष्यांचे अधिवास नष्ट करणे आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणे हे मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  
या आंदोलनांना मुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले..