आमदार अण्णा बनसोडे आयोजित पत्रकार परिषदेत देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे संतापले आणि…

0
530

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी २१ किलो चांदीचे सिंहासन, पादुका व साहित्य देण्याबाबात निमंत्रीत केलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्या दिवशी झालेल्या अपमानावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे चांगलेच भडकले. आमदार अण्णा बनसोडे आयोजित या पत्रकार परिषदेतून संस्थानचे अध्यक्ष संतापून निघून चालल्याने मोठे प्रदर्शन झाले. अनेकदा विनवणी केल्यावर मोरे महाराज थांबले आणि वाद शमला.

देहू येथे १४ जून रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंचावर बोलू न दिल्याने आज देहू देव संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे महाराज चांगलेच भडकले होते. ते पत्रकार परिषदेतून उठले आणि निघून चालले होते. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे यांनी त्यांना विनवणी केल्यानंतर मोरे महाराज पुन्हा विराजमान झाले. या प्रसंगामुळे पत्रकार परिषदेतील वातावरण काही काळ चांगलेच तापले होते. पत्रकारपरिषदेचे मुख्य संयोजक राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बसनोडे आणि विलास लांडे हे विचित्र धार्मिक संकटात सापडले होते.
मोरे महाराज यावेळी संतापून म्हणाले, देहू संस्थेबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी उत्तर दिले जाईल. संस्था धार्मिक कार्य करते. त्याचे राजकारण करू नका. खासदार आणि आमदारांच्या नाराजीबद्दल त्यांना विचारले असता, संस्था योग्य वेळी योग्य प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईल, असे सांगितले.

…जेव्हा नितीन मोरे महाराज प्रेसमधून उठले आणि निघू लागले

अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात का बोलू दिले नाही ? या प्रश्नावर संस्थेचे अध्यक्ष नितीन मोरे महाराज भडकले आणि त्यांनी हा अपप्रचार प्रसारमाध्यमांद्वारे केल्याचा आरोप केला. आम्ही राजकारण करत नाही, प्रोटोकॉलनुसार कार्यक्रम झाला. इथे फक्त सिंहासनाबद्दल बोलायला हवे. अजित पवार बोलत असल्याच्या मुद्द्यावर विचाराल तर मी पत्रकार परिषद सोडेन, असे म्हणत प्रेसमधून ते निघाले होते. आमदार बनसोडे यांनी त्यांची समजूत घातल्यानंतर मोरे महाराज बसले.
१८ जून रोजी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. एकूण २१ किलो चांदीपासून ते तयार करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे ६५ लाख रुपये आहे, अशी माहिती खुद्द अण्णा बनसोडे यांनी दिली. यावेळी माजी आमदार विलास लांडे, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोदले, संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी पैठणकर, आदी उपस्थित होते.अण्णा बनसोडे म्हणाले की, सिंहासन अर्पण कार्यक्रम पंतप्रधानांच्या कार्यक्रमापूर्वी ठरला होता. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात घडलेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो.

पंतप्रधानांचा कार्यक्रम भाजपने हायजॅक केला – विलास लांडे

पत्रकार परिषदेत बोलताना माजजी आमदार विलास लांडे म्हणाले, हा अजित पवारांचा अपमान आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रित. मात्र हा संपूर्ण कार्यक्रम भाजपने हायजॅक केला. देवेंद्र फडणवीस यांना बोलू दिले जाते पण आमचे नेते अजित पवार दाबले जातात. सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री असून फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. मग दोघांपैकी थोरला कोण? राष्ट्रवादी काँग्रेसने या घटनेचा तीव्र शब्दात इन्कार केला आहे. आयोजकांनी प्रोटोकॉल पाळला नाही. संतुकाराम महाराज हे पंतप्रधान मोदींपेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत, त्यांचा आदर आहे. देहूचा कार्यक्रम भाजपने पूर्णपणे हायजॅक केला. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.