आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पहाल तर….; यशोमती ठाकूर यांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

0
84

मुंबई, दि. 26 (पीसीबी) : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच प्रकरणावरून आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना फडणवीसांना इशारा दिला आहे. आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पहाल तर याद राखा असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. यशोमती ठाकूर यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पहाल तर याद राखा असा इशारा यशोमती ठाकूर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. सुजय विखे यांच्यासमोर भाजपच्या स्टेजवर भाजपच्या एका व्यक्तीने बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले हे विखे आणि फडणवीस यांना पटतं का? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ज्यांनी महिलांना प्रोटेक्शन करून आमदारकी घेतली आहे ते आता झोपले आहेत का? यामधून महिलांप्रती आरएसएस आणि भाजपची काय मानसिकता आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी हे वक्तव्य केले त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशी मागणी यशोमती ठाकरू यांनी केली आहे.

से वक्तव्य जर भाजपच्या नेत्यांना आवडत असेल तर त्यांचा निषेध आहे. देवेंद्रजी तुमच्या राज्यात काय चालले आहे? याला आपण रामराज्य म्हणायचं का तुमचा असली रंग समोर येत असून आमच्या मुलींकडे चुकीच्या नजरेने पाहाल तर खबरदार याद राखा असा इशाराही यावेळी यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. दरम्यान आता या प्रकरणावरून ऐन विधानसभा निवडणुकीत वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.