आमच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच – गिरीश महाजन

0
77

नांदेड, दि. १७ (पीसीबी) : महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरुन सस्पेन्स टिकवून ठेवले आहे. पण महायुतीत मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेंच सुरूच आहे. त्यात खंड पडलेला नाही. अजित दादा हेच राज्याचे मुख्य म्हणून बॅनर झळकले. तर एकनाथ शिंदे हेच महायुतीचा चेहरा असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच आता गिरीश महाजन यांनी त्यांच्या मनातील CM देवेंद्र फडणवीसच असल्याचे जाहीर करुन टाकले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती कुणाच्या चेहऱ्यावर मत मागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नांदेडमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते माता गुजरीजी विसावा उद्यानात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी हुतात्म्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पोलीस दलाकडून हवेत तीन फेऱ्या झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. या मुक्ती संग्राम दिन सोहळ्याला स्वातंत्र्य सैनिक, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ अजित गोपछडे, यांच्यासह आमदार, सर्वच विभागातील अधीकारी, कर्मचारी,नागरिक उपस्थित होते.

आता तो त्यांचा प्रश्न आहे कोणाला गुडघ्यावर टेकवायचं, असे त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबतीत वक्तव्य केले. सरकार पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे. दहा टक्के आरक्षण सुद्धा आम्ही दिल आहे. कायमस्वरूपी टिकणार आरक्षण द्यावे ही भूमिका सरकारची आहे. आम्हाला टिकणारा आरक्षण द्यायचा आहे मराठा समाजाच्या मुलाला जास्तीत जास्त फायदा होईल, असे ते म्हणाले. परवा धनगर समाजा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, मला ट्राफिकमुळे त्या बैठकीला यायला उशीर झाला मी त्या बैठकीला अपेक्षित होतो. पण त्यातून सकारात्मक चर्चा झाली. धनगर बांधवांचा समाधान झालं आहे, असा दावा त्यांनी केला.

आपल्या सगळ्याला कल्पना आहे आमच्याकडे चेहरा एकच आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस, भाजपाचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्रजीत होतील. पण आमच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, असे ते म्हणाले. प्रतापराव पाटील चिखलीकर आमच्या सोबत आहेत, खंबीरपणे सोबत आहेत सगळे जग दावा करत आहेत.100% सरकार तरल घोडा मैदान समोर आहे पुढे काय काय होतं बघा.पुन्हा आमचा महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.