पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरु असतानाच आता खुद्द अजित पवारांनीच या चर्चांना पूर्णविराम दिले आहे. या चर्चांमध्ये कसलेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले स्पष्ट केले आहे.
तसेच अजित पवार हे भाजपसोबत जाणार, यांच्या फक्त वावड्या उठात आहेत, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. मात्र, अजित पवार यांनी आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नका, म्हणत संजय राऊतांना नाव न घेताच अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.