आमचे प्रवासी पळवितो का? असे म्हणत बसचालकाला…

0
142

पिंपरी, दि. ०३ (पीसीबी) : आमचे प्रवासी पळवितो म्‍हणून रिक्षा चालकाने बसमध्‍ये चढून चालक व वाहकाला शिवीगाळ करीत गोंधळ घतला. ही घटना सोमवारी (दि. २) दुपारी दोन वाजताच्‍या सुमारास चाकणमधील तळेगाव चौक येथे घडली.

सुभाष गोविंद पवळे (वय २५, रा. भारतमाता चौक, मोशी) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीएमपीचे बस चालक पांडूरंग मारूती भोमाळे (वय ३८) यांनी याबाबत सोमवारी (दि. २) चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी भोमाळे हे पीएमपीच्‍या बसवर चालक आहेत. महाळुंगे ते भोसरी अशी बस घेऊन जात होते. त्‍यांनी चाकणमधील तळेगाव चौकातून प्रवासी घेतले. तेव्‍हा मागच्‍या दारातून आरोपी सुभाष पवळे हा बसमध्‍ये चढला. त्‍याने बसचे वाह सुदर्शन जाधव यांना शिवीगाळ करू लागला. तसेच बसमध्‍ये गोंधळ घालू लागला. त्‍यामुळे चालक भाेमाळे यांनी बस थांबविली. शिवीगाळ करण्‍यास काय झाले, अशी विचारणा केली. त्‍यानंतर तो पुढच्‍या दरवाजाजवळ आला. तुम्‍ही बसवाले आमच्‍या रिक्षाचे प्रवासी घेऊन जातात, असे म्‍हणत शिवीगाळ करीत बोनटवर नाचला. आरोपी पवळे याने फिर्यादी हे करीत असलेल्‍या सरकारी कामात अडथळा आणला. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.