आमची ही लढाई गद्दारीच्या वृत्ती विरोधात – आदित्य ठाकरे

0
215

मुंबई , दि. १४ (पीसीबी) : ऋतुजा लटके यांना हाय कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हाय कोर्टाने गुरुवारी ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यामुळे आता लटके यांचा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकाळा झाला आहे. यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचाच विजय होईल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी लटके यांच्या राजीनाम्यावरून पुन्हा एकदा शिंदे गटावर घणाघत केला आहे.

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर घणाघात केला आहे. कालपर्यंत एका महिलेला त्रास दिला गेला. महापालिकेवर राजीनामा न घेण्यासाठी दबाव असल्याचं दिसून येत होतं. हे खोके सरकारचं घाणेरडं राजकारण आहे. आमची ही लढाई गद्दारीच्या वृत्तीविरोधात आहे. आमच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा निश्चित विजय होईल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दली आहे.

दरम्यान दुसरीकडे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून देखील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत आमचाच उमेदवार विजयी होईल असा दावा केला जात आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवार अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहे. त्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे घोषणा करतील. या निवडणुकीमध्ये आम्हीच बाजी मारू असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे. दोन्ही गटाकडून विजयाचा दावा करण्यात येत असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.