आमची गाडी आडवतो, तुझा तर मर्डर करतो, मला ओळखले का मी हिंजवडीचा भाई…

0
308

हिंजवडी, दि. १ (पीसीबी) – हायवा हे वाहन वाहतुकीच्या विरुदध दिशेने येत होता. शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास थांबविण्याचा इशारा केला. त्याचा राग आल्याने हायवा चालकाचा आरोपी मालक व त्याचा मित्र सह आरोपी २ यांनी संगनमत करीत फिर्यादीला वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्याने जमिनीवर पाडुन मारहाण केली. तसेच आरोपी फिर्यादी यांना शिवगाळ करीत ‘आमची गाडी आडवतो, तुझा तर मर्डर करतो, मला ओळखले का मी हिंजवडीचा भाई अमित साखरे आहे’. असे म्हणत आरोपीने सह आरोपी २ याला ‘काढ रे हत्यार, याचा मर्डर करुन टाकु ” अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

ही घटना (दि. २७) रोजी सायंकाळी ७.०० वाजेच्या सुमारास क्रोमा टि जंक्शन, फेज २ रोड, हिंजवडी येथे घडली. फिर्यादी हिंजवडी वाहतुक शाखेचे पोलीस यांनी आरोपी अमित साखरे, प्रथमेश हांडे (रा. हिंजवडी), पाहिजे आरोपी हायवा चालक (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

हिंजवडी पोलिसांनी दोघांच्या विरोधात १६६/२०२३ भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, १८६, ३२३, ५०४, ५०६, ३४ मो.वा. कायदा ११९/१७७ १५(२)(९)/१७७ नुसार गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.