आमचा कोणी नाद करत नाही म्हणत तरुणास बेदम मारहाण

0
71

चिखली, दि. 02 (पीसीबी) : चहाच्या दुकानात बसण्यासाठी तरुणाने जागा मागितली. त्यावरून ‘आमचा कोणी नाद करत नाही आणि तू मला सरक म्हणतो’ असे म्हणत तिघांनी मिळून एका तरुणास मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 30) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चेरी चौक चिखली येथील चाय गरम या हॉटेलमध्ये घडली.

रुपेश सुभाष जाधव (वय 17, रा. मोई, ता. खेड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय राठोड, यश साठे, गौरव थोरात (सर्व रा. घरकुल चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश जाधव शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चेरी चौकातील चाय गरम या हॉटेलमध्ये गेले. तिथे आरोपी बसले होते. रुपेश यांनी अजय राठोड याला ‘जरा सरका मला बसायला जागा द्या’ असे म्हटले. त्या कारणावरून अजय राठोड याने ‘तू मला ओळखत नाही का. मी अजय राठोड आहे. मला सगळे अज्जू बचकांड म्हणतात. हे माझे मित्र यश साठे व गौरव थोरात आहेत. आम्ही सर्व घरकुल चिखली मध्ये राहतो. आमचा कोणी नाद करीत नाही आणि तुम्हाला सरक म्हणतो’ असे म्हणून रुपेश यांना शिवीगाळ करून हातातील कड्याने मारहाण केली. इतर आरोपींनी देखील रुपेश यांना मारून जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी रुपेश यांचा मित्र अमोल रोकडे आला असता त्याला देखील आरोपींनी मारहाण केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.