आप सुध्दा लढणार चिंचवडची पोटनिवडणूक

0
334

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असतानाच, यामध्ये आता वेगळे ट्विस्ट येत आहेत. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक बिनविरोध होण्याबाबत शंका उपस्थित केली होती. आज आम आदमी पक्षाने या निवडणुकीत उडी घेतली आहे. यामुळे आता बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता जवळ-जवळ मावळली आहे.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पक्ष पूर्ण ताकद लावूव उतरणार असे ‘आप’चे पदाधिकारी चेतन बेंद्रे यांनी स्पष्ट केले आहे. बेंद्रे म्हणाले की, “मागील दोन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. सर्वांची अशी इच्छा आहे की, चिंचवड विधानसभा आपने लढवली पाहिजे.” बेंद्रेंनी दिलेल्या या माहितीनंतर आता पोटनिवडणुकीची लढत तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी ही निवडणूक लढवावी लागणार असल्याचे संकेत दिले होते. पवार म्हणाले, ‘चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आम्ही लढवणार आहोत. या मतदारसंघातल्या बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ही पोटनिवडणूकलढवावी, असा आग्रह धरला आहे. त्यांच्या आग्रहाखातरच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. या संदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.’ असे पवार यांनी नुकतेच पुण्यात बोलले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंतर आता आपने चिंचवडच्या पोटनिवडणुकीत उडी घेतल्याने, ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता जवळ-जवळ मावळले आहे. तरीही ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार की राष्ट्रवादी, आपसोबतच इतरही छोटे मोठे पक्ष आणि अपक्षांची भर पडणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.चिंचवड मतदारसंघात पिंपळे गुरव, सैदागर, निलख, रहाटणी, वाकड, रावेत पुनावळे या परिसरात आयटी चा मोठा वर्ग मतदार आहे. ५ लाख ६६ हजार मतदारांमध्ये सुमारे दीड लाख आयटी अभियंते असल्याचा अंदाज आहे. अरविंद केजरिवाल यांचे या घटकाला मोठे आकर्षण आहे. आणि तोच मतदार भाजपचा सुध्दा असल्याने जर का आपचा उमेदवार रिंगणात आला तर त्याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो