आप तोडून भाजपमध्ये या, तुमच्यावरील सारे खटले संपतील

0
304

नवी दिल्लीचे उपमुख्यमंत्री यांचा मोठा गौप्यस्फोट

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा वापर करत आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याचे भाजपाचे तंत्र जोमात आहे. महाराष्ट्रात शिवसेना फोडून भाजपाने सरकार बनविले आता नवी दिल्ली मधील आपचे सरकार फोडून तिथेही सत्तांतर कऱण्याचा भाजपाचा डाव उघड झाला आहे. मनीष सिसोदिया यांनी त्याबाबत मोठा गौप्यस्फोट केल्याने भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीबद्दल लोक संतापले आहेत.

दिल्लीतील अबकारी धोरण व नवीन दारू धोरणातील कथित भ्रष्टाचाराविरूध्द आम आदमी पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने नुकतीच झाडाझडती केली होती. याच सिसोदिया यांना भाजपकडून ‘`आप तोडून भाजपमध्ये या, तुमच्यावरील सारे खटले संपतील” असा संदेश आल्याच्या चर्चेने आज खळबळ उडाली. सिसोदिया यांनीच ट्विट करून आपल्याला भाजपने ही ‘आॅफर’ दिल्याचे सांगितले. भाजपने यावर थेट काही न बोलता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सिसोदिया यांनी, आपल्याला भाजपने आॅफर दिल्याचे सांगतानाच आपण भाजपचा हा प्रस्ताव धुडकावल्याचेही त्याच ट्विटमध्ये स्पष्ट केले. ‘‘मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे. कोणी माझा शिरच्छेद केला तरी मी भ्रष्टाचारी व कटकारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्याविरूध्दचे सारे खटले खोटे आहेत. (तुम्हाला) जे करायचे ते करून घ्या.” अशी गर्जना सिसोदिया यांनी केली. त्यावर पलटवार करताना भाजप खासदार प्रवेश साहेबसिंह वर्मा म्हणाले, की महाराणा प्रताप यांच्या नावाने सिसोदिया यांनी राजकारण करू नये. जातीधर्माच्या राजकारणाला भाजप थारा देत नाही. तुम्ही घोटाळ्यात अडकताच जातीचे कार्ड खेळण्यास सुरवात केली हे दिल्लीकर पहात आहेत. महाराणा प्रताप यांचे वंशज दारू विक्रीतून भ्रष्टाचार करत नाहीत हे सिसोदिया यांनी लक्षात ठेवावे.

दरम्यान, दिल्लीतील पटपडगंज या मध्यम-उच्चमध्यमवर्गीयांची बहुसंख्या असलेल्या भागाचे आमदार असलेले सिसोदिया यांना पटपडगंज, लक्ष्मीनगर मयूर विहार, प्रीत विहार या परिसरांत त्यांना पाठिंब्याचे फलक लागले आहेत. आगामी गणेशोत्सव या भागांतही दणक्यात साजरा होतो त्यावरही सिसोदिया यांची चौकशी व त्यांची संभाव्य धरपकड यांचे पडसाद उमटणे अपरिहार्य मानले जाते.

सिसोदिया यांनी भाजपकडून आपल्याला ऑफर आल्याचे सांगितले. त्यावर कोणी ही ऑफर दिली हे जाहीर करा असे प्रतीआव्हान भाजपमधून देण्यात आले. सिसोदिया यांच्यावरून आप वर ह्ललाबोल करताना भाजप नेत्यांनी सांगितले की आपचा भ्रष्टाचार व दिल्लीकर जनतेच्या कोट्यवधी रूपयांची नासाडी जगजाहीर होत आहे. ज्यांचे विचार इतके छोटे आहेत अशा लोकांना तोडण्याचे भाजपकडून का प्रयत्न होतील असा सावल करून पक्षनेते गौरव भाटीया म्हणाले की आप नेतृत्वा (केजरीवाल) खरेच देशातील सर्वांत प्रामाणिक नेते असतील तर त्यांनी, नवीन अबकारी धोरण का आणले व त्यात भ्रष्टाचार झाला नव्हता तर 9 महिन्यांत ते रद्द का केले ? या भाजपच्या प्रश्नावर केडरीवाल गप्प का बसले आहेत ? त्यांनी यावर उत्तर न देणे हीच आपच्या भ्रष्ट्चाराची कबुली होय.

बकारी धोरणाबाबत तज्ज्ञांच्या समितीने उपराज्यपालांना ज्या शिफारसी केल्या होत्या त्याच्या बरोबर उलट धोरण केजरीवाल-सिसोदिया यांनी आणले. पहिल्याच फटक्यात 144 कोटींचा घओटाळा झाला. याला जबाबदार आप नव्हे तर कोण आहे ? केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही केजरीवाल यांनी भाजपच्या प्रश्नांना उत्तरे न दिल्याबद्दल त्यांना पुन्हा घेतले.