आपली सुरक्षितता ,आपली जबाबदारी,आणि आपले आरोग्य आपली जबाबदारी . डाँ.प्रमोद कुबडे

0
101

पिंपरी, दि. 07 (पीसीबी) : आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त असणे गरजेचे आहे ,आरोग्य अशी गोष्ट आहे की पैशाने विकत घेता येत नाही .निरोगी आरोग्यासाठी व्यायाम, संतुलित आहार,ताणतणाव मुक्त जीवन जगा, असे आवाहन गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. प्रमोद कुबडे यांनी केले.

वाहतूक विभागाचे उपायुक्त बापूसाहेब बांगर म्हणाले की आपल्या शहरात गेल्या दोन वर्षात 373 रस्ते अपघातात नागरिक मृत्यू झाले 70 खून दोन वर्षातील 20 ते 40 वयोगटातील नागरिकांचे झाले आहेत. जास्तीत जास्त दुचाकी आणि पाई चालणाऱ्या नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. “आपण सुरक्षित तर आपले कुटुंब “सुरक्षित रहा, व्यसनमुक्त जीवन जगा, जग सुंदर आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
बी.एल.जोशी लायन्स इंटरनॅशनलचे म्हणाले की, विम्या यासंबंधीची माहिती कोणी गांभीर्याने घेत नाही. देशात फक्त 5%ते 6% लोकांचा विमा आहे. वार्षिक उत्पन्नाच्या 25% रकमेच्या तरी विमा घेतला पाहिजे. प्रत्येकाचा जीवन विमा ,अपघात विमा असणे गरजेचे आहे .

राजेंद्र साळुंके निवृत्त सहाय्यक आयुक्त म्हणाले की कामगारांनी काम करताना एसओपी पाळली पाहिजे फाजील आत्मविश्वास जीविताला घातक ठरू शकतो कोणत्या प्रकारचे काम समजल्याशिवाय करू नये असे त्यांनी सांगितले.
कामगार मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण म्हणाल्या की, खंत व्यक्त केली की भारतात वाहतुकीचे नियम मोडणे हे स्टेटस समजले जाते. हेल्मेट न घालणे, सिग्नल न पाळणे, हे दुर्दैवी आहे . विम्याचे महत्त्व आम्ही महाराष्ट्रभर संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना पटवून देणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.
वृक्षमित्र व मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार म्हणाले कि कामगार कल्याण मंडळ व मराठवाडा जनविकास संघ दोन्ही संस्था मिळून यापुढे रक्तदान शिबिरे ग्रामीण भागात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले

शहराध्यक्ष मोहम्मदशरीफ मुलांणी यांनी प्रास्ताविक करून मंडळांने आता पण राबवलेले योजना व सामाजिक कार्याची माहिती दिली.
सचिव राजेश हजारे यांनी महाराष्ट्र कामगार मंडळांने बंद केलेले साहित्य संमेलन परत पत्रव्यवहार करून चालू केल्याचे सांगितले.
यावेळी काम कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारतीताई चव्हाण ,सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र साळुंके, उपायुक्त वाहतूक विभाग बापूसाहेब बांगर, प्रांतकाल लायसन इंटरनॅशनलचे बी. एल .जोशी ,डॉ प्रमोद कुबडे एमडी स्टार हॉस्पिटल, वृक्षमित्र अरुण पवार ,अँड अनिरुद्ध सानप,कोअर कमिटी सदस्य भरत शिंदे, राजेश हजारे,आण्णा जोगदंड, तानाजी एकोंडे, संजय गोळे, संपत खैरे इत्यादी उपस्थित होते.
शहराध्यक्ष महंतांनीमद शरीफ मुलांणी, अशोक सरतापे, ज्ञानेश्वर मलशेट्टी ,शंकर नाणेकर ,शिवाजी पाटील यांनी आयोजन केले.

सुत्रसंचालन भरत भारी यांनी केले तर आभार शिवाजी पाटील यांनी मानले