आपला ‘हक्काचा माणूस’ पुन्हा संसदेत पाठवा – खासदार बारणे

0
333

थेरगावच्या ‘होम पिच’वर बारणे यांची प्रचाराची जोरदार ‘बॅटिंग’!

थेरगावमध्ये भेटीगाठी व कोपरा सभांवर बारणे यांचा भर

पाऊस व अंधारातही खासदार बारणे यांचा प्रचार जोरात

आपला ‘हक्काचा माणूस’ पुन्हा संसदेत पाठवा – खासदार बारणे

दि २१ एप्रिल (पीसीबी ) थेरगाव – गेली अनेक वर्ष राजकारणात असूनही आपण कधीही सत्ता डोक्यात जाऊ दिली नाही. थेरगाव परिसराचा कायापालट करणारा व नागरिकांच्या अडीअडचणींना धावून येणारा आपला हक्काचा माणूस पुन्हा एकदा संसदेत पाठवा, असे भावनिक आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.

मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या पहिल्या फेरीची सांगता बारणे यांनी थेरगाव या स्वतःच्या गावात केली. प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या निवासस्थानी जाऊन भेटीगाठी घेण्याबरोबरच ठिकठिकाणी कोपरा सभा घेऊन खासदार बारणे यांनी मतदारांशी संवाद साधला.

थेरगाव गणेशनगरमध्ये पुष्पवृष्टी करून तसेच फटाके वाजवून खासदार बारणे यांचे स्वागत करण्यात आले. शिव कॉलनीमध्ये झालेल्या कोपरा सभेस माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेविका माया बारणे यांच्यासह सोपान चौधरी, विलास जगदाळे, लहू नवले, विजय शिंगटे, राजेंद्र शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारणे म्हणाले की, देश कोणाच्या हातात द्यायचा, हे ठरवणारी ही महत्त्वाची निवडणूक आहे. नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश सुरक्षित असून झपाट्याने विकास करीत आहे. केंद्राच्या माध्यमातून महापालिकेला 4000 कोटींपेक्षा अधिक निधी मिळालेला आहे. त्यातून वॉर्ड-वॉर्डमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसह विविध विकासकामे झाली आहेत. थेरगावने मला नेहमीच सहकार्य केले आहे. आपल्या हक्काच्या माणसाला यावेळी शंभर टक्के मतदान झाले पाहिजे.

कानिफनाथ गुजर यांच्या निवासस्थानासमोर झालेल्या कोपरासभेला भानुदास गुजर, रोहिदास साधू, वसंत गुजर, विठ्ठल गुजर, दीपक गुजर, निखिल गुजर, सुदाम गुजर, नितीन गुजर, प्रकाश गुजर, शाम गुजर, नारायण बारणे, राजेंद्र भोंडवे, नाना पारखी, पोपटराव भेगडे, प्रल्हाद गुजर, अजिंक्य गुजर, अमित गुजर, स्वप्नील गुजर, लालासाहेब गुजर, विक्रम गुजर, सार्थक गुजर, प्रतीक गुजर, गणेश गुजर यांच्यासह परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरीश मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

संतोष मंगल कार्यालयामध्ये झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात खासदार बारणे यांनी मार्गदर्शन केले. त्यावेळी माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेविका मायाताई बारणे, उद्योजक बाळासाहेब बारणे आदी उपस्थित होते. ऋषिकेश काशीद यांनी सूत्रसंचालन केले.

खासदार बारणे यांनी जयदीप माने, तुकाराम गुजर, कांतीलाल गुजर, शालिनीताई गुजर, संभाजी शेलार, गणेश गुजर, विकास गुजर, नवनाथ गुजर, दिगंबर गुजर, भानुदास गुजर, स्वप्नील मातेरे, दिनेश घोगरे, रवी भिलारे, नम्रता भिलारे, सुनीलशेठ पारख, देवेंद्र पारख, डॉ. प्रवीण आव्हाड, मुरलीकांत पेटकर, घनश्याम पवार, भास्कर जावळे, बाळासाहेब पवार, विशाल पवार, मनीषा पवार, प्रमोद पवार, मनोहर पवार आदी मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना सहकार्याचे आवाहन केले.

पिंपळे सौदागर येथे जाऊन खासदार बारणे यांनी भाजपचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पाऊस व अंधारातही प्रचार जोरात

संध्याकाळी आलेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर खंडित झालेला वीजपुरवठा अशा अनेक अडचणींवर मात करत बारणे यांनी मतदारांशी संपर्क साधला.

गोविंद बारणे, अभिषेक बारणे, सुरेश बारणे, सागर भरणे, काशिनाथ बारणे, रमेश बारणे, माऊली बारणे, विजय बारणे, अबूतात्या बारणे, शिवाजी आबा बारणे, करिष्मा सनी बारणे, रामदास बारणे, रमेश बारणे, महेश सुदाम बारणे, विजय बारणे, मारुती पवार, गोरख पवार, अनिल पवार, दिलीप पवार, विश्वनाथ पवार, महेश नंदू बारणे, यांना कैलास बारणे, प्रवीण बारणे, ॲड. दिनकर ज्ञानेश्वर बारणे, श्याम नाना बारणे, नाना बारणे, सचिन पवार, तानाजी बारणे, नवनाथ जाधव, गौरव जाधव आदींच्या निवासस्थानी भेट देऊन बारणे यांनी सहकार्याची विनंती केले. फटाके वाजवून, औक्षण करीत सर्वांनी बारणे यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.