दि. ५ ( पीसीबी ) – भारतीय जनता पक्षात आज मोठ्या संख्येने नवे नेतृत्व सामील झाले असून, आम आदमी पार्टीचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष व माजी शहराध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आकुर्डी विभाग प्रमुख प्रदीप महाजन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह औपचारिक प्रवेश केला.
या भव्य प्रवेश सोहळ्यास भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष व आमदार शंकर जगताप, युवा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, आमदार उमाताई खापरे, कार्यकारी अध्यक्ष, शत्रुघ्न काटे, उद्योजक आघाडी प्रमुख अतुल इनामदार जी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये पुढील नावांचा समावेश आहे:
चेतन गौतम बेंद्रे, अध्यक्ष, पदवीधर आघाडी, आप महाराष्ट्र; माजी शहराध्यक्ष, आप पिंपरी चिंचवड
प्रा. सौ. अरुणा सतिश सीलम, अध्यक्ष, शिक्षक आघाडी, आप पिंपरी चिंचवड; विश्वस्त, बालाजी मंदिर ट्रस्ट
रोहित सरनोबात, संघटन मंत्री, आप पिंपरी चिंचवड
सी एम ए कुणाल वक्ते, अध्यक्ष, विद्यार्थी आघाडी, आप पिंपरी चिंचवड
डॉ. प्रशांत कोलावले, अध्यक्ष, डॉक्टर आघाडी, आप पिंपरी चिंचवड
खुशाल काळे, अध्यक्ष, विद्यार्थी आघाडी, आप पिंपरी
नारायण दामोदर भोसले, संचालक, शिवांजली पतसंस्था; उद्योजक
शिवसेना (उद्धव) गटाकडून प्रवेश करणारे:
प्रदीप महाजन, विभाग प्रमुख
देवानंद कपूरे, उपविभाग प्रमुख
अमोल बोबंले, शाखाप्रमुख
सुनील साबळे, शाखाप्रमुख
उद्योजक गटातून:
राजवर्धन बेंद्रे, राज बेंद्रे, शिवकुमार गुप्ता, अर्पित सुतार, प्रतिक वाघमारे, विशाल डोंगरे
विद्यार्थी व युवक आघाडीतील कार्यकर्ते:
स्वप्नील ढेरंगे, अथर्व ढवळे, विजय आघळे, ऍड. प्रसाद निकुंभ
रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान चे सर्व सदस्य.
इतर सहभागी कार्यकर्ते आणि उद्योजक:
विवेक मामीडवार, महेश देबडवार, प्रशांत कोतूर, रवी अंबाडकर, आशिष यादव, राजेश घुंगार्डे, अशोक कड, अतुल देवडीकर, संजय कुलकर्णी, अनिरुद्ध देशमुख, विवेक अवताडे, आशिष सरदेशमुख, निखिल शहाणे, अजय पाटील, जालिंदर झिंजुरके, मनीष आढाव, लक्ष्मीकांत कोले, कल्पेश मद्रेवार, अविनाश देवशेटवार, संतोष नलदकर, संतोष गादेवार, दत्ता कामठाणे, कमलेश बंडेवार, संजय वट्टमवार.
भाजप नेत्यांनी या सर्व नव्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत, येत्या काळात पक्षाच्या विस्तार व विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान अपेक्षित असल्याचे नमूद केले. प्रवेशकर्त्यांनी भाजपच्या विकासोन्मुख विचारसरणीवर विश्वास ठेवून कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.













































